Sunday, October 6, 2024

इंडियन डेंटल असोसिएशन नांदेड शाखेची कार्यकारिणी जाहीर

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

अध्यक्षपदी डॉ. मिलिंद पांडुर्णीकर तर सचिवपदी डॉ. विपिन सोमानी यांची निवड

नांदेड: इंडियन डेंटल असोसिएशन नांदेड शाखेची वार्षिक सभेची बैठक डॉ.मोतीलाल जांगीड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीला नांदेड जिल्ह्यातील दंत वैद्यकीय तज्ञ बहुसंख्येने उपस्थित होते. या सभेमध्ये २०२२ या वर्षासाठी कार्यकारिणी निवडीचा प्रस्ताव मांडताच जिल्ह्यातील इंडियन डेंटल असोसिएशनचे डाॅक्टरांनी सहमती दर्शवली. यावेळी इंडियन डेंटल असोसिएशन जिल्हा अध्यक्ष पदी डॉ. मिलिंद पांडुर्णीकर यांची तर जिल्हा सचिव डॉ.विपिन सोमानी यांची एकमताने निवड करण्यात आली.

पुढील कार्यकारिणी: कोषाध्यक्षपदी डॉ.पवन दरक , उपाध्यक्षपदी डॉ. सागर मापारे, डॉ. सुशील येमले, सहसचिव डॉ. संदीप दंडे, डॉ. राहुल पाटील यांची निवड करण्यात आली. या कार्यकारिणीचा कार्यकाळ हा एक वर्षाचा आहे. जिल्हा कार्यकारिणीने सामाजिक धार्मिक कार्यात मोठा सहभाग घेतला आहे.

डॉ. दिनेश चव्हाण यांची पुढील वर्षासाठी नियोजित अध्यक्ष पदासाठी निवड होणार आहे. इंडियन डेंटल असोसिएशन महाराष्ट्र राज्य प्रतिनिधी म्हणून डॉ. अरुण निवळे पाटील, डॉ. संतोष बरगले, डॉ. मयुर भट्टड, डॉ.मनिष दागडिया, डॉ.कुमार निवळीकर तर महिला प्रतिनिधी डॉ.रूपाली माने यांची निवड करण्यात आली. यावेळी डॉ.संतोष किसवे, डॉ. चंदन धोंडगे, डॉ असलम बेग, डॉ. समय चव्हाण, डॉ. पांडुरंग श्रीरामे, डॉ. तेजस पाटील, डॉ.सागर राहेगावकर, डॉ. विनोद केजकर, डॉ.स्वप्नील रावते यांच्या सह जिल्ह्यातील अनेक डाॅक्टर उपस्थित होते.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!