Sunday, October 2, 2022

ऑल आऊट ऑपरेशन व नाकाबंदीदरम्यान दोन गावठी पिस्टल व एक जिवंत काडतूस जप्त; शिवाजीनगर गुन्हे शोध पथकाची कारवाई

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड- शिवाजीनगर पोलिसांच्या ऑल आउट ऑपरेशनमध्ये दोघांना अटक करून त्यांच्याकडून दोन पिस्तूल आणि एक जिवंत काडतुस जप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई शिवाजीनगर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने केली.

पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांचे आदेशाने दिनांक २७ जूलै रोजी लावलेल्या ऑलआऊट ऑपरेशन व नाकाबंदीदरम्यान पोलीस अधीक्षक यांनी पोलीस स्टेशनमधील अभिलेखावरील गुन्हेगारांना चेक करुन कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस स्टेशन शिवाजीनगर येथील पोलीस निरीक्षक डॉ. नितीन काशीकर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने आरोपी चेकिंगदरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आण्णाभाऊ साठे चौकात सापळा रचून जबरी चोरीचे प्रयत्नात प्राणघातक हत्यारासहीत असलेला संशयीत आरोपी तेजिंदरसिंघ मोहनसिंघ टप्पेवाले वय २३ वर्ष, रा. सखोजीनगर, जिल्हा नांदेड यास ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे दोन गावठी पिस्टल व एक जिवंत काडतूस हस्तगत केले.

सदर कामगीरी पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, विजय कबाडे व उपविभागीय पोलीस अधिकारी (शहर) चंद्रसेन देशमुख यांचे व पोलीस निरीक्षक डॉ. नितीन काशिकर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे प्रभारी सपोनि रवी वाहुळे, पोउपनि मिलिंद सोनकांबळे, पोहेकॉ इब्राहिम, पोना रवि बामणे, पोना दिलीप राठोड, पोशि देविसिंघ सिंगल, पोशि शेख अझहर व पोशि दत्ता वडजे यांनी कामगिरी पार पाडली.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,508FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles

error: Content is protected !!