Saturday, July 27, 2024

कौठा येथे होणार नांदेड जिल्हा व सत्र न्यायालयाची नवीन इमारत; शनिवारी न्यायमूर्ती नितीन सूर्यवंशी यांच्या हस्ते कोनशिला समारंभ

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

◆ बिलोली अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नूतन इमारतीचेही शनिवारी उदघाटन

नांदेड – शहराच्या कौठा येथे नांदेड जिल्हा व सत्र न्यायालयाची नवीन इमारत बांधण्यात येणार असून या नूतन इमारतीचा कोनशिला समारंभ मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन सुर्यवंशी यांच्या हस्ते शनिवार दि. 25 फेब्रुवारी रोजी होत आहे. याचबरोबर बिलोली येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय नूतन इमारतीचे उदघाटनही शनिवारी करण्यात येणार आहे.

नांदेड येथील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नूतन इमारतीचा कोनशिला समारंभ मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन सुर्यवंशी यांच्या हस्ते होणार आहे. हा समारंभ शनिवार 25 फेब्रुवारी 2023 रोजी सायंकाळी 4.30 वाजता मामा चौक, जुना कौठा नांदेड येथे संपन्न होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा न्यायाधीश नागेश न्हावकर राहणार आहेत. जिल्हा न्यायाधीश-1 शशिकांत बांगर व अभिवक्ता संघाचे अध्यक्ष ॲड . सतीश पुंड यांची यावेळी उपस्थिती राहील. जिल्हा व सत्र न्यायालयाची ही नूतन इमारत तळ मजला व त्यावर सहा मजले याप्रमाणे असल्याचे सांगण्यात असून इमारतीचे एकूण क्षेत्रफळ 26,515.56 चौ.मी असे आहे.

बिलोली येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय नूतन इमारतीचे उदघाटन सकाळी  11 वाजता न्यायालय संकुल, बिलोली येथे संपन्न होईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा न्यायाधीश नागेश न्हावकर राहणार आहेत. बिलोली अभिवक्ता संघाचे अध्यक्ष ॲड. शिवकुमार  पाटील, बिलोली येथील जिल्हा न्यायाधीश-1 दिनेश कोठलीकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती राहील. बिलोली येथील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या या नूतन इमारत बांधकामाचे क्षेत्रफळ 1912.91 स्के. मी. आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!