Saturday, November 9, 2024

क्रूरता: भोकर तालुक्यात आईने स्वतःच्या दोन चिमुकल्या मुलांचे केले खून, नंतर गुपचूप प्रेतं जाळून टाकली

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

निर्दयी आईसह मामा आणि आजीला अटक

नांदेड- जिल्ह्याच्या भोकर तालुक्यात एक अत्यंत क्रूर आणि धक्कादायक घटना घडली आहे. आईने स्वतःच्या दोन चिमुकल्या मुलांचे गळा घोटून खून केले असून नंतर गुपचूप या दोन्ही मुलांची प्रेतं जाळून टाकल्याची घटना समोर आली आहे. आपल्या आई आणि भावाच्या मदतीनं या महिलेने हे क्रूर कृत्य केले आहे.

भोकर तालुक्यातील पांडुरणा येथील एका निर्दयी आईने दोन चिमुकल्यांचा खून करून, आई व भावाच्या मदतीने पुरावा नष्ट करण्यासाठी त्या दोन्ही चिमुकल्यांना जाळून टाकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी भोकर पोलिसांत आज दि. 2 जून रोजी पहाटे दोनच्या सुमारास तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पांडुरणा ता. भोकर येथील धुरपताबाई गणपत निमलवाड (वय ३०) असे प्रमुख आरोपी असलेल्या आईचे नाव आहे. आरोपी महिला पांडुरणा येथे शेत शिवारात आखाड्यावर पती, दोन वर्षीय मुलगा आणि अवघ्या ४ महिन्याच्या मुलीसह रहात होती. तर सासु – सासरे दोघे अन्य दुसऱ्या शेतात वास्तव्यास होते. आरोपी धुरपताबाई निमलवाड हिने दि. ३१ मे ते १ जून च्या सायंकाळी सहा वाजता नंतरच्या कालावधीत मुलगा दत्ता गणपत निमलवाड (वय दोन वर्षे) व मुलगी अनुसया गणपत निमलवाड (वय ४ महिने) या दोघांचा पांडुरणा शिवारात खून केला. त्यानंतर आरोपी आईने तिची आई कोंडाबाई पांडुरंग राजेमोड व भाऊ माधव पांडुरंग राजेमोड (दोघे रा. ब्राम्हणवाडा ता. मुदखेड) यांच्या मदतीने दोन्ही मयत लेकरांची प्रेतं जाळून पुरावा नष्ट केला.

आरोपी आईने अत्यंत क्रूर आणि धक्कादायक असे हे कृत्य का केले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. याबाबत गोविंद दगडुजी निमलवाड यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी धुरपताबाई गणपत निमलवाड, कोंडाबाई पांडुरंग राजेमोड, माधव पांडुरंग राजेमोड आदी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळाला वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी भेट दिली असून पोलिस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिगंबर पाटील तपास करीत आहेत.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!