Saturday, July 27, 2024

खासगी कोचिंग क्लासेसमधील विद्यार्थिनीचा विनयभंग, शिक्षकास अटक; जागतिक महिला दिनी नांदेडमधील प्रकार

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड– शहरात सर्वत्र जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा व विद्यार्थिनींचा मान सन्मान करण्यात येत असतानाच भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आयडीयल इन्स्टिट्यूट या खासगी कोचिंग क्लासेसमधील शिक्षकास अटक करण्यात आली आहे. या शिक्षकाने शिकवणीला आलेल्या विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. शिक्षक आणि विद्यार्थी या नात्याला काळिमा फासणाऱ्या शिक्षकावर गुन्हा दाखल करून भाग्यनगर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.

नांदेड शहराच्या भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत खासगी शिकवणी चालक सतीश नरंगले याचे आयडीयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड मॅथेमॅटिक्स नावाचे क्लासेस चालतात. या क्लासेसमध्ये आलेल्या १२ वर्षीय विद्यार्थिनीचा त्याने विनयभंग केला. हा प्रकार मागील काही दिवसांपासून तो सतत करत असल्याची तक्रार पीडित मुलीने आपल्या पालकांना सांगितली.

सोमवारी दिनांक 7 मार्च रोजी पालकांनी सदर पीडित मुलीला घेऊन भाग्यनगर पोलीस ठाणे गाठले. घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. पोलीस निरीक्षक सुधाकर आडे यांनी याप्रकरणी तात्काळ दखल घेत खासगी शिकवणी शिकविणारा शिक्षक सतीश नरंगलेला अटक केली. उपविभागीय पोलिस अधिकारी चंद्रसेन देशमुख, पोलीस निरीक्षक सुधाकर आडे आणि त्यांचे सहकारी यांनी घटनास्थळाला भेट दिली. जागतिक महिलादिनी घडलेल्या घटनेमुळे विद्यार्थिनी आणि महिला वर्गातून संताप व्यक्त होत आहे. खासगी शिकवणीच्या नावाखाली असे आंबटशौकीन शिक्षक जर विद्यार्थिनीच्या ईज्जतीवर हात टाकत असतील तर पालकांनी विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी पाठवावे की नाही हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून भाग्यनगर पोलीस ठाण्यात विनयभंग व पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल भोसले करत आहेत.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!