Saturday, June 22, 2024

गोळीबाराने पुन्हा हादरले नांदेड ! प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्यावर गोळीबार, हल्लेखोरांनी अनेक गोळ्या झाडल्या

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड– येथील प्रसिद्ध बिल्डर संजय बियाणी यांच्यावर आज मंगळवार दिनांक 5 एप्रिल रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास गोळीबार करण्यात आला आहे. या गोळीबारात संजय बियाणी हे गंभीर जखमी झाले आहेत.

दुचाकीवरून आलेल्या दोघांनी बियाणी यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात संजय बियाणी यांच्यासह त्यांच्या वाहनाचा चालकही जखमी झाला आहे. बियाणी आणि त्यांच्या चालकाला येथील ग्लोबल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बियाणी हे सकाळी घराबाहेर पडताच त्यांच्यावर पाळत ठेऊन असलेल्या हल्लेखोरांनी गोळीबार केला. गोळीबारानंतर बियाणी यांच्या घरासमोर रक्ताचा सडा पडला आहे.

घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे, जिल्हा परिषदेचे सदस्य प्रवीण चिखलीकर यांनी रुग्णालयात धाव घेतली आहे. हल्लेखोर कोण आहेत याचा कसून शोध पोलीस घेत आहेत.

काही दिवसांपूर्वीच संजय बियाणी यांनी त्यांच्या गृह प्रकल्पाचा अत्यंत देखणा असा कार्यक्रम घेतला होता. पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह नांदेड शहरातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला होता.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!