Tuesday, November 5, 2024

चाभरा खून प्रकरणाचा उलगडा: मुलीशी लग्न लावून देत नसल्याने भाच्यानेच केला मामाचा खून, डोक्यात कुऱ्हाड घालून खून

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

अर्धापूर (जि. नांदेड)- चाभरा येथील खून प्रकरणाचा उलगडा झाला असून मामा त्याच्या मुलीशी लग्न लावून देत नसल्याने भाच्यानेच मामाचा खून केल्याचे उघडकीस आले आहे. डोक्यात कुऱ्हाड घालून हा खून करण्यात आला होता. या खून प्रकरणी आरोपीस मनाठा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

संबंधित बातमी 👇🏻

अर्धापूर तालुक्यातील चाभरा येथे दि.९ शुक्रवार रोजी रात्री घराबाहेर झोपलेले बालाजी दिगंबर काकडे यांचा कुऱ्हाडीने वार करून निर्घुण खून करण्यात आला होता. याप्रकरणी मनाठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.  या खून प्रकरणी पोलिसांनी गुप्त खबऱ्यांना कामाला लाऊन पोलिसांनी या प्रकरणी आरोपीचा शोध घेण्याची मोहिम हाती घेतली होती. याप्रकरणी कसून तपास करण्यात आल्यानंतर भाच्यानेच मामाचा खून केल्याचे उघडकीस आले असून आरोपी भाच्याने खुनाची कबुली दिली आहे.

चाभरा येथील बालाजी काकडे यांच्याकडे भाचा एकनाथ बंडू जाधव याने मुलीचा हात मागितला. पण, तू काही काम करत नाहीस असे म्हणत मामाने एकनाथला मुलगी देण्यास नकार दिला. मामा मुलगी देत नसल्याने मामा बद्दल राग मनात ठेवून भाच्याने मामालाच संपविल्याचे तपासात उघड झाले. या खून प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय चव्हाण यांनी तपास करून भाचा एकनाथ बंडू जाधव वय १९ वर्ष यास अटक केली. पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर एकनाथ जाधव याने खून केला असल्याची कबुली दिली. या खून प्रकरणी भाचा एकनाथ बंडू जाधव यास मनाठा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!