Sunday, October 6, 2024

चावी देण्यास नकार दिल्याने चारचाकी वाहन जाळले; नांदेड ग्रामीणला चार जणांविरूद्ध गुन्हा दाखल

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नवीन नांदेड- गाडी चालवून पाहण्यासाठी चावी देण्यास वाहन मालकाने नकार दिल्याने चारचाकी वाहन जाळण्यात आल्याची घटना नांदेड शहराच्या सिडको भागात घडली आहे. याप्रकरणी चार जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घरासमोरील मैदानावर उभे असलेले चारचाकी वाहन जाळल्याची ही घटना सिडकोतील वसंतराव नाईक महाविद्यालय समोरील परिसरात घडली आहे. सिडको येथील रहिवाशी मुकेश सर्पे यांचे आर.जे.०६ सी.४९६२ क्रमांकाचे चारचाकी वाहन आहे. सदर वाहन त्यांनी नेहमीप्रमाणे घरासमोरील मोकळ्या जागेत उभे केले होेते. दि. ५ मे रोजी रात्री १.३० वाजताच्या सुमारास काही तरुणांनी या वाहनाला आग लावली. या आगीत वाहनाचे अतोनात नुकसान झाले असून कागदपत्रेही जळून खाक झाली आहेत. आग लावल्यानंतर पळ काढणारे काही तरुण सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले आहेत.

ही घटना घडण्याच्या काही तासांपुर्वी काही जणांनी सर्पे यांना त्यांचे वाहन वाहन चालविण्यासाठी वाहनाची चावी मागितली होती. सर्पे यांनी चावी देण्यास नकार दिल्याने  जीप क्रमांक आर.जे.०६ सि ४९६२ या गाडीवर वर पेट्रोल टाकुन ही गाडी जाळण्यात आली आहे. या आगीत गाडीच्या सीट, स्टेअरिंग, समोरील काच, आतील संपूर्ण भाग, स्टेपनिचे टायर व गाडीत ठेवलेले मुळ कागदपत्रे असे जळुन खाक झाले असून एकुण १ लाख ९० हजार रुपये नुकसान झाले आहे.

सदर घटनेची माहिती मिळाल्यानंतर नांदेड ग्रामीण ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आनंद बिचेवार व इतर कर्मचाऱ्यांनी जळालेल्या वाहनाची पाहणी केली. या प्रकरणी मुकेश सरपे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलीस स्टेशन येथे चार जणांविरूद्ध कलम ४३५, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार शिंदे हे करीत आहेत.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!