Monday, October 14, 2024

टायर फुटल्याने जीप पुलावरून नदीत कोसळली; दोन जण ठार, मुदखेड तालुक्यातील दुर्घटना

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

https://youtube.com/shorts/dER0gdVcbL4?si=1xn-AlHpJGXcWt4M

मुदखेड (जि. नांदेड)- भरधाव वेगाने जाणाऱ्या क्रुझर जीपचे टायर फुटल्यानेही जीप येळी महाटी पुलावरून गोदावरी नदीत कोसळल्याने झालेल्या भीषण दुर्घटनेत जीपमधील दोन जण ठार झाले आहेत. ही दुर्घटना शुक्रवार दि.१० रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास घडली.

https://www.facebook.com/share/r/EdHnAZy79NZPKwEx/?mibextid=0VwfS7

क्रूझर जीप शिखाचीवाडी (ता. मुदखेड) येथील असून, येथील जीपचालक आणि येळी (ता. लोहा) येथील युवक चिलपिंपरी येथे बोळवण सोडून शुक्रवारी सायंकाळी येळीकडे निघाले होते. भरधाव वेगातील ही क्रूझर जीप येळी- महाटीच्या पुलावर आली असता अचानक जीपचे टायर फुटले आणि जीप पुलावरून गोदावरी नदीत कोसळली. मृतांमध्ये दोघांचा समावेश असून उध्दव खानसोळे आणि बबलू ढगे अशी त्यांची नावे असल्याचे सांगण्यात आले.

या घटनेचे वृत्त समजताच नजीकच्या ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मदत व बचावकार्य सुरू केले. या घटनेची माहिती मिळताच मुदखेड पोलीस व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. या दुर्घटनेबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!