Friday, December 6, 2024

टीव्हीचा आवाज कमी करण्यास सांगितल्याचा रागातून भररस्त्यात शेजाऱ्याचा चाकूने भोसकून खून

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड– घरातील टीव्हीचा आवाज कमी कर असे म्हणाल्याच्या रागातून शेजारी असलेल्या प्रेमानंद जोंधळे याला मिल गेट एरियामध्ये गाठून एकाने चाकुने भोसकून भररस्त्यात त्याचा खून केल्याची घटना घडली आहे. ही घटना शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली. आरोपी हा गुन्हेगार असल्याचे सांगण्यात आले असून कृष्णा हातांगळे असे आरोपीचे नाव असल्याचे समजते.

मिल गेट परिसरातील भारतनगर येथे राहणाऱ्या प्रेमानंद भगवान जोंधळे (वय 32) याच्या घरासमोरच आरोपीचे घर आहे. आरोपी हा आपल्या टीव्हीचा आवाज मोठा करत असल्याने त्याला आवाज कमी करण्याबाबत मयत प्रेमानंद हे सतत सांगायचे. परंतु मला सतत आवाज कमी करण्यास सांगतो, याचा राग मनात धरून शनिवारी दि. ३० रोजी रात्री साडेआठच्या सुमारास मिलगेट समोर शिवशक्ती भागात गाठून प्रेमानंद जोंधळेच्या पोटात चाकूने भोसकून खून केला. घटनास्थळावरून आरोपी पसार झाला.

ही माहिती मिळताच वजिराबाद पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जगदीश भंडरवार, स्थानिक गुन्हे शाखेचे द्वारकादास चिखलीकर यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या प्रेमानंद जोंधळेला शासकीय रुग्णालय विष्णुपुरी येथे दाखल करण्यात आले. परंतु अति रक्तस्राव झाल्याने उपचार सुरू होण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे रुग्णालय सूत्रांनी सांगितले. याप्रकरणी वजिराबाद पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!