Saturday, July 27, 2024

डोक्यात कुऱ्हाडीचे घाव घालून पत्नीचा खून, नंतर पत्नीच्या साडीने पतीची गळफास घेऊन आत्महत्या; बिलोली तालुक्यातील घटना

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

◆ रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेळकोणी बु. येथील घटना

नायगाव बाजार- डोक्यात कुऱ्हाडीचे घाव घालून पत्नीचा खुन करुन पत्नीच्याच साडीने पतीने लिंबाच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना बिलोली तालुक्यातील बेळकोणी (बु.) येथे आज मंगळवारी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान घडली. सदर घटनेची माहिती मिळाल्यानंतर रामतीर्थ पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला आहे. 

रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या बेळकोणी बु. येथील शेतकरी दांपत्य नामदेव नरसींग तोकलवाड (४०) व  रंजना नामदेव तोकलवाड (३६) हे दोघेजण आज सकाळी शेतात गेले होते. शेतात काम करत असताना दोघा पती पत्नीत शाब्दिक बाचाबाची झाली आणि रागाच्या भरात पत्नीने आधी पतीवर कुऱ्हाड उगारली. यामुळे राग अनावर झालेल्या पतीने तीच कुऱ्हाड पत्नीच्या डोक्यात घातली, यात पत्नीचा जागीच मृत्यू झाला.

पत्नी रंजना शेतातच रक्ताच्या थारोळ्यात पडलेली असतानाच पती नामदेव तोकलवाड यांनी पत्नीच्या अंगावरील साडी काढून बाजूला असलेल्या लिंबाच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना आज मंगळवारी सकाळी ११ च्या दरम्यान घडली. दोघा पती पत्नी यांच्यात जो काही शाब्दिक वाद झाला असेल किंवा बाचाबाची झाली, यात कुणीही मध्यस्थी केली नाही. किवा आत्महत्या करत असताना नामदेव तोकलवाड यास वाचवण्याचाही प्रयत्न झाला नसल्याने पतीने पत्नीला यमसदनी धाडून स्वतः ला संपवल्याने त्यांच्या संसाराची राखरांगोळी झाली असून दोन मुली व एक मुलगा उघड्यावर पडला आहे.

या घटनेची माहिती मंगळवारी दुपारी रामतीर्थ पोलिसांना समजताच सहायक पोलीस निरीक्षक विजय जाधव, उप निरिक्षक शेख लतीफ, बिट जमादार आर.एस.पठाण, ईगळे पाटील, संजय शिंदे, अदिनी घटनास्थळी जावून रितसर पंचनामा केला व उत्तरीय तपासणी साठी मयत पती पत्नीचे प्रेत बिलोलीच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवून दिले आहे. सदरच्या घटनेमुळे बेळकोणी येथे खळबळ उडाली असून दोन मुली व एक मुलगा आई वडीलांच्या छत्रछायेपासून पोरके झाले आहेत.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!