Monday, December 11, 2023

‘तो’ मृतदेह राठोड क्लासेसचे कैलास राठोड यांचे भाऊ इंदल राठोड यांचा! शासकीय विश्रामगृहामागील विहिरीत सापडला मृतदेह

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड- येथील शासकीय विश्रामगृहामागे विहिरीत आढळलेला मृतदेह राठोड क्लासेसचे कैलास राठोड यांचे भाऊ इंदल राठोड यांचा असल्याचे उघड झाले आहे.

शहराच्या सह्याद्री शासकीय विश्रामगृहासमोर असलेल्या देवगिरी शासकीय विश्रामगृहाच्या पाठीमागे असलेल्या एका विहिरीमध्ये इंदल धर्मा राठोड (वय ४५) याचा मृतदेह आढळून आला. ही घटना बुधवार दि. 6 जूलै रोजी दुपारी एकच्या सुमारास हा मृतदेह आढळून आला. अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी मृतदेह बाहेर काढला. यावेळी घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झालेली होती.

शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या देवगिरी विश्रामगृहामागील एका विहिरीमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. ही माहिती महानगरपालिकेच्या अग्निशमन पथकाला मिळाल्यानंतर अग्निशमन दलाचे अधिकारी रईस पाशा व त्यांचे पथक, गोदावरी जीव रक्षक दलाचे नुरखान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह बाहेर काढला.

हा मृतदेह श्रीनगर येथील राठोड कोचिंग क्लासेसचे संचालक कैलास राठोड यांचे लहान भाऊ इंदल राठोड यांचा असल्याचे उघडकीस आले आहे. त्याचा श्रीनगर भागातच पुस्तक विक्रीचा व्यवसाय होता. परंतु मागील काही दिवसापासून ते व्यसनाच्या आहारी गेले होते, त्यातूनच त्यांनी आत्महत्या केली असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कैलास राठोड यांच्या फिर्यादीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालय विष्णुपुरी येथे पाठविण्यात आला आहे. मयत इंदल राठोड याच्या पार्थिवावर त्याचे मूळ गाव कुरळी, तालुका उमरखेड, जिल्हा यवतमाळ येथे अंत्यविधी करण्यात येणार असल्याचे कैलास राठोड यांनी सांगितले.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]

Latest Articles

error: Content is protected !!