Saturday, July 27, 2024

धक्कादायक: तपोवन एक्सप्रेसला गळफास घेऊन एकाची आत्महत्या; नांदेड रेल्वे स्थानकावरील घटना

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड– येथील हजूर साहिब नांदेड रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर उभ्या असलेल्या तपोवन एक्सप्रेस रेल्वे गाडीच्या बाहेरच्या बाजूने खिडकीला गळफास घेऊन एकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज दिनांक 30 मार्च रोजी सकाळी नऊच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी लोहमार्ग पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

तपोवन एक्सप्रेस ही मुंबईकडे निघण्यापूर्वी प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर गाडी यार्डमध्ये उभी होती. या गाडीच्या एका बोगीतील शौचालयाच्या बाहेरच्या बाजूने खिडकीला मोठ्या दस्तीने गळफास घेऊन एका 25 वर्षीय अनोळखी युवकाने आत्महत्या केली. ही माहिती लोहमार्ग पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे यांना रेल्वे प्रशासनाने कळविली. यानंतर उनवणे यांच्या सुचनेवरून महिला सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजया मेलफेदेवार या आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धावल्या. मृतदेह खाली उतरून पंचनामा करून तपासणी केली. त्याच्याजवळ कुठलेच ओळखीचे पुरावे सापडले नाहीत.

मयताचा चेहरा गोल, रंग सावळा, उंची साडेपाच फूट, दाढीमिशी बारीक, केस काळे, सडपातळ बांधा, अंगावर पिवळ्या रंगाचा शर्ट, निळ्या रंगाची पॅन्ट असा पेहराव आहे. रेल्वेला गळफास घेऊन अशाप्रकारे आत्महत्या करण्यात आल्याचा हा प्रकार प्रथमच घडला आहे. मयत कुणाचा परिचित किंवा जर कुणाचा नातेवाईक असेल तर लोहमार्ग पोलीस नांदेड किंवा सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजया मेलफेदेवार यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे यांनी केले आहे. सदरचा मृतदेह विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयातील शवागृहात ठेवण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!