ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड– पतीचा अपघात होऊन त्यात त्याचे निधन झाल्याची माहिती समजताच पत्नीने गळफास घेत जगाचा निरोप घेतल्याची धक्कादायक घटना नायगाव तालुक्यात घडली आहे.
नायगाव तालुक्यातील बेंद्री येथील अरुण बाबुराव बेंद्रीकर (वय ३२ ) हे दिनांक ६ एप्रिल २०२४ रोजी रात्री नऊ ते साडेनऊच्या सुमारास बेंद्री या गावी आपल्या दुचाकीने जात असताना त्यांना कोलंबी ते मांजरम दरम्यान त्यांच्या दुचाकीला भीषण अपघात झाला. या अपघातात त्यांचे जागीच निधन झाले. त्यांच्या खिशातील कागदपत्रांआधारे त्यांच्या घरी या अपघाती निधनाची माहिती देण्यात आली. पतीच्या अपघाती निधन झाल्याचा जबर मानसिक धक्का बसलेल्या अरुण बेंद्रीकरच्या पत्नी स्नेहा अरुण बेंद्रीकर यांनी घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.
त्यांच्या पश्चात दोन वर्षाची एक मुलगी आहे. अरुण बेंद्रीकर हे वीज वितरण कंपनीत कार्यरत होते. पती- पत्नीच्या या अकाली निधनाने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
