Saturday, July 27, 2024

धक्कादायक: संजय बियाणी यांच्यावर गोळ्या घालून हत्येचे सीसीटीव्ही फुटेज; गोळीबाराची घटना आणि दोन हल्लेखोर कॅमेऱ्यात कैद

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड– येथील प्रसिद्ध बिल्डर संजय बियाणी यांच्यावर आज मंगळवार दिनांक 5 एप्रिल रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास गोळीबार करण्यात आला आहे. या गोळीबारात संजय बियाणी हे गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. या थरारक घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पुढे आले असून यात गोळीबाराची घटना आणि दोन हल्लेखोर कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.

संबंधित बातमी 👇🏻

दुचाकीवरून आलेल्या दोघांनी बियाणी यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात संजय बियाणी हे गंभीर जखमी झाले. बियाणी यांना ग्लोबल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे, पण त्यांचे प्राण वाचू शकले नाहीत. बियाणी हे सकाळी घराबाहेर पडताच त्यांच्यावर पाळत ठेऊन असलेल्या हल्लेखोरांनी गोळीबार केला. गोळीबारानंतर बियाणी यांच्या घरासमोर रक्ताचा सडा पडला होता.

या घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे तसेच इतर पोलीस अधिकाऱ्यांनी त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे सदस्य प्रवीण चिखलीकर यांनी रुग्णालयात धाव घेतली आहे. हल्लेखोर कोण आहेत याचा पोलीस कसून शोध घेत आहेत.

काही दिवसांपूर्वीच संजय बियाणी यांनी त्यांच्या गृह प्रकल्पाचा अत्यंत देखणा असा कार्यक्रम घेतला होता. पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या नांदेड शहरातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला होता.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!