Friday, December 6, 2024

धर्मादाय सहआयुक्त यांचे नांदेड येथे महिन्यातील दोन आठवडे होणार कामकाज

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड- नांदेड, हिंगोली, परभणी जिल्ह्यातील धर्मादाय सह आयुक्त कार्यालयाशी निगडीत प्रलंबित प्रकरणांची संख्या लक्षात घेता हे कार्यालय नांदेड येथे असणे जनहिताच्या दृष्टिने महत्वाचे आहे.नांदेड येथे विशेष मोहिम म्हणून महिन्यातील दोन आठवडे हे कार्यालय येथे असेल.

या संदर्भात शासनाच्या निर्देशानुसार नांदेड, हिंगोली व परभणी येथील प्रलंबित न्यायीक प्रकरणे निकाली काढण्यासाठी औरंगाबाद धर्मादाय सहआयुक्त एस.जे.बियाणी यांची प्रत्येक महिन्याच्या सोमवार पासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या व तिसऱ्या आठवड्यात कामकाजाकरिता जानेवारी 2022 पासून पुढील आदेशापर्यंत नियुक्ती करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय संदर्भांतील कामकाज आता होईल. महिन्याचे उर्वरित दिवस धर्मादाय सह आयुक्त औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातील प्रकरणांचे कामकाज पहावे, असे निर्देश महाराष्ट्र राज्य मुंबईचे धर्मादाय आयुक्त प्र.श्रा.तरारे यांनी दिले.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!