Saturday, July 27, 2024

धर्माबाद तालुक्यातील शेतात आढळले गावठी पिस्तुल आणि जिवंत काडतूसं

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड- धर्माबाद तालुक्यातील येवती फाटा वाय पॉईंट परिसरातील शेतात एक गावठी पिस्तूल व जिवंत काडतुस आढळून आली आहेत.

धर्माबाद तालुक्यातील येवती फाटा परिसरातील लालू भुरोड यांच्या शेतासमोरील सार्वजनिक रस्त्यावर एक बेवारस पिस्तूल असल्याची माहिती धर्माबाद पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक विजय पंतोजी हे आपल्या पथकासह घटनास्थळावर गेले. याठिकाणी त्यांना एक गावठी पिस्तूल व जिवंत काडतुस आढळून आले.

हे गावठी पिस्तुल व काडतुस त्यांनी जप्त केले असून अज्ञात व्यक्तीविरुद्ध धर्माबाद पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. तपास फौजदार अनिशा सय्यद करत आहेत. अज्ञात आरोपीने हे विनापरवाना बेकायदेशीर पिस्तुल याठिकाणी फेकले की ते याठिकाणी पडले याचा पोलीस तपास करीत आहेत.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!