Saturday, July 27, 2024

‘नंदिग्राम एक्स्प्रेस’ रेल्वेखाली येवून तरूण- तरुणी ठार; भोकर शहरातील घटना

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

भोकर (जि. नांदेड)- मुंबईकडे निघालेल्या ‘नंदिग्राम एक्स्प्रेस’ रेल्वेखाली येवून तरूण- तरुणी  ठार झाल्याची घटना भोकर शहरात रेल्वे गेटजवळ घडली आहे.

आदिलाबादहुन मुंबईकडे जाणारी नंदिग्राम एक्सप्रेस रेल्वे शुक्रवार दिनांक ११ नोव्हेंबर रोजी दूपारी अंदाजे साडेतीन वाजेच्या सूमारास रेल्वेगेट जवळ आली. याचवेळी एक तरुण व एक तरुणी रेल्वे पटरी ओलांडत असताना रेल्वेखाली आले. यात दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना भोकर शहरात घडली. अपघात एवढा भयानक होता की तरुणाचे अक्षरशः दोन तुकडे झाले तर तरुणी पटरीच्या लांब फेकली गेली. रेल्वे प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी येत असल्याची माहिती मिळाली.

सदर झालेली घटना पहाण्यासाठी नागरीकांनी एकच गर्दी केली. शहराच्या मध्यभागी रेल्वे गेट असल्यामुळे या ठिकाणाहून नागरिकाची ये जा मोठ्या प्रमाणात असते. आदिलाबाद मुंबई हे विशेष रेल्वे गाडी साडेतीन वाजता दुपारी रेल्वे गेटजवळ आली असता हा भयानक अपघात घडला. दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!