Saturday, July 27, 2024

नांदेडचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक निलेश मोरे आणि विजय कबाडे यांची बदली; भोकरच्या अति. पोलीस अधीक्षकपदी धरणे तर नांदेडला परभणीहून अविनाश कुमार

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड– भारतीय पोलीस सेवा आणि राज्य पोलीस सेवेतील पोलीस अधीक्षक आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश आज सोमवार दिनांक 7 नोव्हेंबर रोजी राज्याचे सहसचिव वेंकटेश भट्ट यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आले आहेत. यात नांदेडचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक निलेश मोरे आणि भोकर विभागाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजय कबाडे या दोन्ही अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. विजय कबाडे यांची अप्पर पोलीस अधीक्षक वर्धा येथे बदली झाली असून निलेश मोरे यांना तूर्त पदस्थापना देण्यात आलेली नाही.

यवतमाळ जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक खंडेराय आप्पा धरणे यांची भोकर उपविभागात याच पदावर बदली झाली असून परभणीचे उपविभागीय पोलीस अधिकारी अविनाश कुमार यांची नांदेडच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्याच्या गृह विभागाने एकूण १०९ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. पोलीस अधिकाऱ्यांची नावं आणि त्यांना देण्यात आलेली नियुक्ती याची यादी खालीलप्रमाणे 👇🏻

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!