Monday, October 14, 2024

नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण; तात्काळ मंत्रिमंडळ बैठकीतून बाहेर पडले

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड/ मुंबई- राज्यात कोरोनाची तिसरी लाट धडकली आहे. रुग्णसंख्या कमी-अधिक होत असल्यामुळे संकट मात्र कायम आहे. तर दुसरीकडे राजकीय नेत्यांना कोरोना लागण होण्याचे सत्र सुरूच आहे. काँग्रेसचे नेते आणि नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांना कोरोनाची लागण झाली आहे. धक्कादायक म्हणजे, अशोक चव्हाण हे कॅबिनेट बैठकीला हजर होते. रिपोर्ट येताच राज्य मंत्रिमंडळाची बैठक सोडून अशोक चव्हाण तात्काळ बाहेर पडले.

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. अशोक चव्हाण हे मंत्रिमंडळाच्या बैठकीला हजर होते. बैठक सुरू असताना अशोक चव्हाण यांचा रिपोर्ट हाती आला. त्यामुळे  बैठक सुरू असताना चव्हाण कॅबिनेट बैठकीमधून निघून गेले. अशोक चव्हाण यांना याआधीही कोरोनाच्या पहिल्या लाटेत कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार करण्यात आले होते.

काल भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 72 व्या वर्धापन दिनानिमित्त नांदेड येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज पोलीस कवायत मैदानावर पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झाले. तसेच इतरही विविध कार्यक्रमांना त्यांनी हजेरी लावली. त्यानंतर आज ते मुंबईत मंत्रिमंडळ बैठकीला हजर होते.

गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील अनेक मंत्री आणि विविध पक्षांतील अनेक प्रमुख नेत्यांना कोरोनाची लागण होत असल्याचं दिसून येत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर काही दिवसांपूर्वीच पंकजा मुंडे, सुप्रिया सुळे, रोहित पवार, राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील, दिलीप वळसे पाटील यांना कोरोनाची लागण झाली. या सर्व मंत्री आणि नेत्यांनी कोरोनावर मात केली आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!