Saturday, July 27, 2024

नांदेडच्या वजिराबाद पोलीस वसाहतीत घरावर झाड कोसळले; पोलिसासह कुटुंब जखमी

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड- वजिराबाद ठाण्याला लागुन असलेल्या पोलीस वसाहतीत एका घरावर झाड कोसळले. यात शहर वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय जखमी झाले. ही घटना आज रविवार दि. २७ मार्च रोजी सकाळी घडली.

वजिराबाद पोलिस वसाहत निजामकालीन असून या वसाहातील घरे आता अंत्यत जुनी आणि असुरक्षित झाली आहेत. रविवारी सकाळी 11 वाजता टवाहतूक शाखेचे पोलीस हवालदार धुमाळ यांच्या घरावर झाड कोसळले. यात त्यांची पत्नी आणि मुलगी यांनासुद्धा मार लागला आहे. सर्वांना रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी झाडांची कटींग करुन बाहेर काढले. यावेळी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!