Saturday, July 27, 2024

नांदेडजवळील बालकाश्रमातून तीन बालकांचे अपहरण; गुन्हा दाखल

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड– येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठापासून काही अंतरावर असलेल्या धनगरवाडीवाडी फाटा येथील लहुजी साळवे निराश्रित बालकाश्रमातून तीन अल्पवयीन बालकांचे अपहरण करण्यात झाले आहे. ही घटना २७ डिसेंबर ते २९ डिसेंबरच्या दरम्यान घडली आहे. याप्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात अपहरणकर्त्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वीही या बालकाश्रमातील बालकांचे अपहरण करण्यात आले होते.

नांदेड तालुक्यातील धनगरवाडीवाडी फाटा येथे लहुजी साळवे निराश्रित बालकाश्रम असून ते लालबाग घाटे हे चालवतात. या बालक आश्रमातून बालकांचे अपहरण होण्याचा घटना घडली आहे. यापूर्वीही या आश्रमातून बालकांचे अपहरण झाल्याबाबत गुन्हे नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल आहेत. यापूर्वी अपहरण झालेल्या मुलांचा शोध सुरू असतानाच पुन्हा एकदा २७ ते २९ डिसेंबरच्या दरम्यान बालक आश्रमातील  तीन बालकांचे अपहरण करण्यात आले आहे. ही मुलं हैदराबाद, ओरिसा येथील मूळ राहणारी आहेत.

अपहरणाची ही बाब बालक आश्रमाचे व्यवस्थापक यांना समजताच त्यांनी संचालक लालबा घाटे यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना ही माहिती दिली. व्यवस्थापनाने या बालकांचा शोध घेतला, मात्र ते सापडले नाहीत. अखेर बालक आश्रमाचे व्यवस्थापक शरद वामन पवार, राहणार गुलाबवाडी तालुका कंधार, हल्ली मुक्काम लहुजी साळवे निराश्रित बालकाश्रम धनगरवाडी यांच्या फिर्यादीवरून नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक महेश कोरे करत आहेत.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!