ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
![](http://godateer.com/wp-content/uploads/2021/12/png-transparent-logo-whatsapp-watercolor-splash.png)
नांदेड– शहर आणि जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या वाढीचा वेग कायम असून आज रविवारीही मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढले आहेत. आज एकुण 786 नवे रुग्ण आढळून आले आहेत.
आज एकूण 2012 टेस्टिंग पैकी 786 पॉझिटिव्ह निघाले आहेत. पैकी मनपा हद्दीतील रुग्ण संख्या 412 आहे. आज 507 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आज एकही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.
जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 2 हजार 12 अहवालापैकी 786 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 648 तर अँटिजेन तपासणीद्वारे 138 अहवाल बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 98 हजार 495 एवढी झाली असून यातील 91 हजार 508 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 4 हजार 329 रुग्ण उपचार घेत असून यात 3 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 658 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 392, नांदेड ग्रामीण 49, भोकर 7, देगलूर 2, धर्माबाद 2, कंधार 5, हदगाव 10, किनवट 36, लोहा 3, मुदखेड 20, मुखेड 13, उमरी 16, माहूर 35, परभणी 26, हिंगोली 8, लातूर 1, अकोला 1, नागपूर 2, हैद्राबाद 4, तेलंगणा 1, पुणे 1, वाशीम 1, राजस्थान 2, बुलढाणा 3, यवतमाळ 2, उमरखेड 1, औरंगाबाद 3, निजामाबाद 2 तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा 20, बिलोली 19, किनवट 2, मुखेड 21, नांदेड ग्रामीण 5, देगलूर 20, लोहा 3, नायगाव 6, अर्धापूर 8, धर्माबाद 17, माहूर 2, उमरी 5, भोकर 2, हदगाव 5, मुदखेड 3 असे एकुण 786 कोरोना बाधित आढळले आहे.
आज जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 2, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 432, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 67, खाजगी रुग्णालय 4, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 2 असे एकुण 507 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली.
उपचार घेत असलेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपूरी 30, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 4, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 921, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 3 हजार 338, हदगाव कोविड रुग्णालय 1, खाजगी रुग्णालय 33, बिलोली कोविड रुग्णालय 2 असे एकुण 4 हजार 329 व्यक्ती उपचार घेत आहेत.
जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती-
एकुण घेतलेले स्वॅब- 8 लाख 32 हजार 58
एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 18 हजार 655
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 98 हजार 495
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 91 हजार 508
एकुण मृत्यू संख्या-2 हजार 658
उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 92.90 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-18
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-89
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-4 हजार 329
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-3.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
![](http://godateer.com/wp-content/uploads/2021/12/png-transparent-logo-whatsapp-watercolor-splash.png)