Sunday, October 6, 2024

नांदेडमध्ये आज कोरोना रुग्णसंख्येत दुपटीने वाढ; तब्बल ७४ नवे रुग्ण

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड- शहर आणि जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. आज तर कोरोना रुग्णसंख्येत कालच्या तुलनेत दुपटीपेक्षा अधिक वाढ झाली आहे. आज शुक्रवार दि. 7 जानेवारी रोजी आलेल्या अहवालानुसार तब्बल 74 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.

आज एकूण 995 टेस्टिंग पैकी 74 पॉझिटिव्ह निघाले आहेत. पैकी मनपा हद्दीतील रुग्ण संख्या 46 आहे. आज 08 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आज एका ही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. काल गुरुवारी 36, परवा बुधवारी 39 त्याआधी 10 रुग्ण असे करत कोरोना रुग्णांचा आकडा आज तब्बल 74 वर गेला आहे.

जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 995 अहवालापैकी 74 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 69 तर अँटिजेन तपासणीद्वारे 5 अहवाल बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 756 एवढी झाली असून यातील 87 हजार 898 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 203 रुग्ण उपचार घेत असून 4 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 655 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 46, नांदेड ग्रामीण 10, धर्माबाद 1, लोहा 1, माहूर 1, मुदखेड 3, अर्धापूर 1, मणिपूर 1, पुसद 1, लातूर 2, मुंबइ 1, हिंगोली 1 तर ॲटीजन तपासणीद्वारे अर्धापूर 2, कंधार 1, मुदखेड 1, नायगाव 1 असे एकूण 74 कोरोना बाधित आढळले आहे. आज जिल्ह्यात नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 6, खाजगी रुग्णालय 2 कोरोना बाधिताला औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली.

आज 203 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपूरी 15, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 2, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 27, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 151,  खाजगी रुग्णालय 8 अशा एकुण 203 व्यक्ती उपचार घेत आहेत.

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 8 लाख 3 हजार 47
एकुण निगेटिव्ह स्वॅब- 6 लाख 98 हजार 688
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 756
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 898
एकुण मृत्यू संख्या-2 हजार 655
उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.85 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-3
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-203
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-4

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!