Saturday, November 9, 2024

नांदेडमध्ये कोरोना रुग्णसंख्येची वाढ थांबेना! आज आकडा 800 पार ! 857 नवे रुग्ण तर 619 रुग्ण झाले बरे !

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड– शहर आणि जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येची थांबत नसून त्यात अधिकाधिक वाढ होत आहे. आज शनिवारी तर हा आकडा 800 पार गेला आहे. आज एकुण 857 नवे रुग्ण आढळून आले आहेत.
आज एकूण 2258 टेस्टिंग पैकी 857 पॉझिटिव्ह निघाले आहेत. पैकी मनपा हद्दीतील रुग्ण संख्या 480 आहे. आज 619 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आज एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.


नांदेड जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 2 हजार 258 अहवालापैकी 857 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 749 तर अँटिजेन तपासणीद्वारे 108 अहवाल बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 97 हजार 709 एवढी झाली असून यातील 91 हजार 1 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 4 हजार 50 रुग्ण उपचार घेत असून यात 3 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे.
 
जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 658 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 454, नांदेडग्रामीण 56, भोकर 5, देगलूर 25, धर्माबाद 4, कंधार 19, हदगाव 2, किनवट 53, लोहा 21, मुदखेड 5, मुखेड 13, नायगाव 8, हिमायतनगर 12, बिलोली 8, उमरी 4, अर्धापूर 2, माहूर 5, हिंगोली 9, परभणी 19, अकोला 1, पुसद 2, निझामाबाद 3, आदिलाबाद 1, लातूर 10, जालना 3, उस्मानाबाद 1, बीड 1, बुलढाणा 1, औरंगाबाद 2 तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा 26, नांदेड ग्रामीण 7, बिलोली 14, देगलूर 6, धर्माबाद 8, किनवट 31, माहूर 3, नायगाव 8, उमरी 2, हदगाव 3 असे एकुण 857 कोरोना बाधित आढळले आहे.
 
आज जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 2, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 566, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 47, खाजगी रुग्णालय 2, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 2 असे एकुण 619 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली.
उपचार घेत असलेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपूरी 27, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 3, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 743, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 3 हजार 248, हदगाव कोविड रुग्णालय 1, खाजगी रुग्णालय 26, बिलोली कोविड रुग्णालय 2 असे एकुण 4 हजार 50 व्यक्ती उपचार घेत आहेत.
 
जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती:
एकुण घेतलेले स्वॅब- 8 लाख 30 हजार 46
एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 17 हजार 536
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 97 हजार 709
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 91 हजार 1
एकुण मृत्यू संख्या-2 हजार 658
उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 93.13 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-7
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-145
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-4 हजार 50
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-3.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!