Saturday, July 27, 2024

नांदेडमध्ये पुन्हा फायरिंग: मित्रानेच झाडली मित्रावर गोळी; विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड– शहराच्या विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत नुरी चौक माळटेकडी परिसरात चक्क मित्रानेच मित्रावर गावठी कट्ट्यातून फायरिंग केली. यात एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर नांदेडच्या विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना आज गुरुवार दि.९ फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या सुमारास घडली.

नांदेड शहराच्या माळटेकडी परिसरातील नुरी चौक भागात शेख इरफान शेख गुड्डू (वय 25) राहणार मगदूमनगर, न‌ई आबादी नांदेड आणि त्याचा मित्र ओली पार्टी करत होते. खाण्यापिण्याच्या कारणावरून दोघात वाद झाला. यावेळी आरोपी मित्राने शेख इरफान शेख गुड्डू याच्यावर आपल्या जवळ असलेल्या गावठी कट्ट्यातून फायरिंग केली. यात शेख इरफान याच्या पोटाला गोळी लागली आहे. या घटनेची माहिती समजताच विमानतळाचे पोलीस अधिकारी  यांच्यासह आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठले.

जखमी शेख इरफान याला विष्णुपुरीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येत असून प्रकृती गंभीर असल्याचे रुग्णालय सूत्राने सांगितले. शहराच्या इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन फायरिंगच्या घटना ताज्या असतानाच पुन्हा नांदेड शहरामध्ये विमान ठाण्याच्या हद्दीत फायरिंगची घटना घडली आहे. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!