Friday, March 29, 2024

नांदेडमध्ये वाढ कायम, आज 421 !

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड– शहर आणि जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत होणारी वाढ कायम आहे. आज शनिवारीही कोरोना रुग्णसंख्या 400 पारच असून आज 421 नवे रुग्ण आढळून आले आहेत.

आज एकूण 1818 टेस्टिंग पैकी 421 पॉझिटिव्ह निघाले आहेत. यात मनपा हद्दीतील रुग्ण संख्या 307 इतकी आहे. आज 62 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आज एका ही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. 421 अहवाल कोरोना बाधित आले आहेत, यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 364 तर अँटिजेन तपासणीद्वारे 57 अहवाल बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 93 हजार 163 एवढी झाली असून यातील 88 हजार 288 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. जिल्ह्यात आजच्या घडीला 2 हजार 220 रुग्ण उपचार घेत असून 3 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 655 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 290, नांदेड ग्रामीण 17, भोकर 3, देगलूर 5, धर्माबाद 3, हिमायतनगर 1, कंधार 6, किनवट 1, लोहा 7, माहूर 1, मुदखेड 3, मुखेड 3, नायगाव 3, वाशीम 1, परभणी 6, हिंगोली 2, अकोला 1, अमरावती 1, जालना 2, पुणे 1, यवतमाळ 1, गडचिरोली 1, मुंबई 1, हैद्राबाद 1 तर ॲटीजन तपासणीद्वारे नांदेड मनपा 17, नांदेड ग्रामीण 1, अर्धापूर 2, भोकर 1, बिलोली 11, देगलूर 1, धर्माबाद 1, हदगाव 1, किनवट 3, माहूर 1, मुदखेड 4, मुखेड 11, नायगाव 3 असे एकूण 421 कोरोना बाधित आढळले आहे. आज जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 3, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 53, खाजगी रुग्णालय 3, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातर्गत गृह विलगीकरण 3 कोरोना बाधिताला औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली.

आज 2 हजार 220 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपूरी 18, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 6, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 477, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 1 हजार 697, खाजगी रुग्णालय 22 अशा एकुण 2 हजार 220 व्यक्ती उपचार घेत आहेत.

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती-

एकुण घेतलेले स्वॅब- 8 लाख 16 हजार 179
एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 8 हजार 927
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 93 हजार 163
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 88 हजार 288
एकुण मृत्यू संख्या-2 हजार 655
उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.76 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-33
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-108
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 2 हजार 220
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-3.

संक्षिप्त माहितीचा तक्ता वरीलप्रमाणे 👆🏻

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]

Latest Articles

error: Content is protected !!