Saturday, July 27, 2024

नांदेडमध्ये सोमवारी कोरोना रुग्णांची संख्या आली 215 वर; 334 रुग्ण झाले बरे

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड– शहर आणि जिल्ह्यात सातत्याने वाढत चाललेल्या कोरोना रुग्णसंख्येत हळू हळू घट होण्यास सुरुवात झाली आहे. आजही कोरोनाबाधितांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक असून आज सोमवारी एकुण 215 नवे रुग्ण आढळून आले आहेत तर 334 रुग्ण बरे झाले आहेत.

आज एकूण 1203 टेस्टिंग पैकी 215 पॉझिटिव्ह निघाले आहेत. पैकी मनपा हद्दीतील रुग्ण संख्या 110 आहे. आज 334 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आज 4 रुग्णाचा मृत्यू झालेला आहे.

जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 1 हजार 203 अहवालापैकी 215 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 185 तर अँटिजेन तपासणीद्वारे 30 अहवाल बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 1 हजार 495 एवढी झाली असून यातील 96 हजार 415 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 2 हजार 409 रुग्ण उपचार घेत असून यात 3 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे.


रविवार 30 जानेवारी रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे खडकपुरा नांदेड येथील 85 वर्षाचा पुरुष, वसमत येथील 70 वर्षाचा पुरुष, किनवट कोविड रुग्णालय येथे उमरखेड येथील 77 वर्षाचा पुरुष तर खाजगी रुग्णालय हाऊसींग सोसायटी नांदेड येथील 82 वर्षाच्या एका पुरुषाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.  जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 671 एवढी आहे.
 
आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 83, नांदेड ग्रामीण 10, बिलोली 1, भोकर 1, धर्माबाद 1, हिमायतनगर 1, हदगाव 3, कंधार 2, किनवट 56, लोहा 4, मुदखेड 3, मुखेड 1, नायगाव 2, उमरी 4, परभणी 9, हिंगोली 2, निजामाबाद 1, वाशीम 1 तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा 27, कंधार 3 असे एकुण 215 कोरोना बाधित आढळले आहे. 

आज जिल्ह्यात नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 85, खाजगी रुग्णालय 7, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 242 असे एकुण 334 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली. 
 
उपचार घेत असलेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपूरी 36, किनवट कोविड रुग्णालय 4, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 1 हजार 281,  नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 1 हजार 56, खाजगी रुग्णालय 32 असे एकुण 2 हजार 409 व्यक्ती उपचार घेत आहेत. 
 
जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती
एकुण घेतलेले स्वॅब- 8 लाख 45 हजार 202
एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 27 हजार 826
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 1 लाख 1 हजार 495
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 96 हजार 415
एकुण मृत्यू संख्या-2 हजार 671
उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.99 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-1
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-138
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-2 हजार 409
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-3. 
 

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!