Saturday, July 27, 2024

नांदेड शहरात पुन्हा साडेसहा लाखांची बॅग लिफ्टिंग

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

डॉक्टर लेन भागातील घटना

नांदेड- शहराच्या डॉक्टर लेन परिसरात एचडीएफसी बँकेसमोर व्यापाऱ्याची साडेसहा लाख रुपयाची बॅग अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. ही घटना शुक्रवार, दिनांक २४ डिसेंबर रोजी दुपारी तीनच्या सुमारास घडली. वजिराबाद पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.


शहरातील व्यापाऱ्यांनी एचडीएफसी बँकेतून साडेसहा लाख रुपये काढले. आणि बॅग आपल्या दुचाकीमध्ये ठेवली. अज्ञात चोरट्यांनी त्यांची नजर चुकवून साडेसहा लाख रुपयांची ही बॅग लंपास केली. ही बाब लक्षात येताच त्यांनी वजिराबाद पोलिसांना हे कळविले. वजिराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार त्यांचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. चोरट्यांचा शोध सीसीटीव्ही कॅमेरेच्याद्वारे सुरू असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!