Saturday, July 27, 2024

निजामाबाद जिल्ह्यात भीषण रस्ता अपघात; कुंडलवाडीतील दोन सख्ख्या भावांसह चार जण ठार

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

कुंडलवाडी (जि. नांदेड)- निजामाबाद जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग 44 वर भीषण रस्ता अपघात झाला आहे. इंदलवाई मंडलातील चंद्रायनपल्ली येथे हा अपघात झाला. या घटनेत चार जण ठार झाले आहेत. यात कुंडलवाडी येथील निरडी परिवारातील दोन सख्खे भाऊ गणेश हणमंलु निरडी, आदित्य हणमंलु निरडी हे ठार झाले आहेत. या दोन भावांसह कुंडलवाडी येथीलच प्रकाश सायबु अंकलवार आणि चौथा निजामाबाद येथील रहिवासी साईराम भाळे हे दोन जण असे एकूण चार जण या अपघातात ठार झाले आहेत.

या घटनेची संपूर्ण माहिती अद्याप मिळू शकली नाही. मयतांचे नातेवाईक निजामाबाद येथील शासकीय रुग्णालयात दाखल झाले आहेत. तरुण मुलांचा अपघातात मृत्यू झाल्याने कुंडलवाली शहरावर शोककळा पसरली आहे. अपघातात ठार झालेले निरडी बंधू यांचा मोबाईल शॉपीचा व्यवसाय होता.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!