ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
▪️आरक्षण सोडतीकडे लागले इच्छुकांचे लक्ष
अर्धापूर (जि.नांदेड)- तालुक्यासह जिल्ह्यातील जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांचे आरक्षण निश्चित करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने २६ जुलैपासून सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. दि.२८ जुलै गुरुवार रोजी प्रत्यक्ष सोडत होणार आहे.
दि.२६ जुलै रोजी जिल्हाधिकारी आरक्षण सोडतीची सूचना प्रसिद्ध करणार असून जिल्हा परिषदेच्या गट आणि गणामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व महिला राखीव जागांचे आरक्षण सोडत काढली जाणार आहे दि.२८ जुलै रोजी जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण सोडत होईल. २९ जुलै ते २ ऑगस्टपर्यंत आरक्षण निश्चितीबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे हरकती व सूचना सादर करता येतील. त्यानंतर ५ ऑगस्ट रोजी अंतिम आरक्षण राजपत्रात प्रसिद्ध केले जाणार आहे. राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी हा आदेश काढला आहे.
सोडतीकडे लागले अनेकांचे लक्ष…
अर्धापूर तालुक्यात दोन पंचायत समिती गण व एक जिल्हा परिषद गट वाढल्याने सर्वांचे लक्ष आरक्षण सोडतीकडे लागले आहे. मागिल वर्षी एकुण ४ जागा होत्या ओपन २, एससी महिला १, ओबीसी महिला १ असे होते. तर यावर्षी मालेगाव, लहान, येळेगाव ही जिल्हा परिषद गट असून येळेगाव, पिंपळगाव, मालेगाव,कामठा, लहान, पार्डी म. ही पंचायत समिती गण आहेत. आरक्षण सोडतीकडे जिल्ह्यातील इच्छुकांचे आणि इतरही अनेकांचे लक्ष लागले आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻