Saturday, July 27, 2024

पंतप्रधान नरेंद्र मोदी २० एप्रिल रोजी नांदेडमध्ये; मोदी ग्राऊंडवर होणार मोदींची सभा

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दि. 20 एप्रिल रोजी नांदेडमध्ये येत आहेत. त्यांच्याच नावे ओळखल्या जाणाऱ्या असर्जन रोडवरील मोदी ग्राउंड येथे भाजप महायुतीचे उमेदवार खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान मोदी यांची सभा होणार आहे.

नांदेड लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नांदेडच्या “मोदी ग्राउंड, मामा चौक, असर्जन रोड येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेच्या व्यासपीठ व मंचाचा भूमिपूजन सोहळा मंगळवारी पार पडला. यावेळी नांदेड लोकसभेचे भाजपा महायुतीचे उमेदवार खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, माजी आमदार अमरनाथ राजुरकर, प्रदेश सचिव देविदास राठोड, संघटन मंत्री संजय कौडगे, भाजपा जिल्हाध्यक्ष संतुकराव हंबर्डे, भाजपा जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख, मिलिंद देशमुख, चैतन्यबापु देशमुख, प्रवीण साले, बाळू खोमणे, जीवन घोगरे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

यावेळी पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, पोलीस उपअधीक्षक सुशीलकुमार नायक यांनी सभेच्या जागेचा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षा व्यवस्थेच्या उपाययोजनांचा आढावाही यावेळी घेतला.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!