Saturday, July 27, 2024

परतीचा पाऊस शेतकऱ्यांच्या जीवावर: हिमायतनगर तालुक्यातील सिबदरा शिवारात दोन शेतकऱ्यांवर वीज कोसळली, एक जण जागीच ठार

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

हिमायतनगर (जि. नांदेड)- परतीचा पाऊस शेतकऱ्यांच्या जीवावर उठला आहे. याच पावसात वीज कोसळून एक शेतकरी ठार झाला आहे तर एक गंभीर जखमी झाला आहे. हिमायतनगर तालुक्यातील सिबदरा शिवारात ही दुर्घटना घडली आहे.

शहरासह तालुक्यात मंगळवार दिनांक 18 ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस सुरू झाला. यात सिबदरा येथील शेत शिवारात सोयाबीन काढणीसाठी गेलेल्या दोन शेतकऱ्यांवर वीज कोसळली. यात सुनील वायकोळे हे ठार झाले.

वारंगटाकळी येथील शेतकरी सुनील साहेबराव वायकोळे (वय 34) हे सोयाबीन काढणीसाठी सिबदरा येथे गेले होते. अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसात शेतातील सोयाबीनवर फारी झाकण्यासाठी धावपळ करत असताना दोन शेतकऱ्यावर अचानक वीज कोसळली, त्यात एक जण जागीच ठार झाला तर दुसरा गजानन टोकलवाड हा गंभीर जखमी झाला असल्याचे घटनास्थळी उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांनी सांगितले.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!