Saturday, July 27, 2024

पोलीस ठाण्यासमोरच पोलिसाला थापड-बुक्यांनी मारहाण; मरखेल येथील धक्कादायक घटना

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड– पोलीस ठाण्यात कामानिमित्त आलेल्या एका महिलेसह दोघांनी चक्क पोलिसालाच मारहाण करून गोंधळ घातल्याची घटना देगलूर तालुक्यात घडली आहे. हा प्रकार 12 मे रोजी दुपारी एकच्या सुमारास मरखेल पोलीस ठाण्यासमोर घडला.

नांदेड जिल्ह्यातील शेवटच्या टोकाला, तेलंगणा सीमेवर असलेल्या देगलूर तालुक्यात मरखेल पोलीस ठाण्यात हा धक्कादायक प्रकार घडला. या ठाण्यात एका कामानिमित्त राहुल भिमराव राठोड (वय 19), भीमराव बंडू राठोड (वय 55) आणि सुमनबाई भीमराव राठोड (वय 50) (राहणार आंदेगाव तांडा, तालुका मुखेड) हे गेले होते. दुपारी एकच्या सुमारास या तिघांमध्ये आणि पोलीस कर्मचारी विष्णुकांत चामलवाड यांच्यात वाद झाला. हा वाद अचानक टोकाला गेला आणि पोलीस ठाण्यासमोर असतानाच या तिघांनी पोलीस विष्णुकांत चामलवाड यांना शिवीगाळ करत थापड- बुक्यांनी मारहाण केली. हा गोंधळ सुरू असल्याने ठाण्यात उपस्थित असलेल्या काही कर्मचाऱ्यांनी धाव घेत हा वाद मिटविला आणि या तिघांनाही ताब्यात घेतले.

याप्रकरणी विष्णुकांत चामलवाड यांच्या फिर्यादीवरू शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी मरखेल पोलीस ठाण्यात वरील तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नामदेव मद्दे करत आहेत. पोलीस ठाण्यात पोलिसांना मारहाण झाल्याच्या या प्रकाराने सारेच हैराण झाले आहेत.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!