Saturday, July 27, 2024

प्रेमी युगुलाची गोदावरी नदीत उडी; नागरिकांच्या सतर्कतेमुळे दोघेही बचावले, नांदेडच्या नावघाट पुलावरील प्रकार

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड- शहरातील गोदावरी नदीवर असलेल्या नावघाट पुलावरून प्रेमीयुगलांनी गोदावरी नदी पात्रात उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना आज घडली. मात्र याठिकाणी असलेल्या नागरिकांच्या सतर्कतेमुळे या दोघांचाही जीव वाचला असून मुलाला किरकोळ मार लागल्याचे सांगण्यात आले आहे. हे प्रेमीयुगुल लोहा तालुक्यातील शेवडी येथील असल्याचे सांगण्यात येत आहे.

इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या नावघाट पुलावरून शनिवार दिनांक ८ जुलै रोजी सकाळी सहाच्या सुमारास या प्रेमीयुगुलांनी गोदावरी पात्रात उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र उपस्थित नागरिकांनी व गोदावरी जीव रक्षकांनी तात्काळ नदीपात्रात उतरून या दोघांनाही बाहेर काढले. इतवारा पोलिसांना ही माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.

या दोघांनी आत्महत्येचा प्रयत्न नेमका का केला याची विचारपूस सुरू आहे. हे दोघेही लोहा तालुक्यातील शेवडी बाजीराव येथील असल्याचे सांगण्यात येत आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!