Friday, December 6, 2024

बंडानंतर कडक पोलीस बंदोबस्तात नांदेडला परतले आमदार बालाजी कल्याणकर; रेल्वे स्थानकावर समर्थकांकडून ढोल ताशांच्या गजरात स्वागत

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

◆ मिरवणूकीद्वारे निवासस्थानाकडे रवाना

नांदेड– एकनाथ शिंदे यांनी केलेले बंड आणि त्यानंतर राज्यात झालेले सत्तांतर… या बंडानंतर नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर कडक पोलीस बंदोबस्तात नांदेडला परतले. सुमारे 20 दिवसांनंतर नांदेडला आलेले आ. कल्याणकर यांचे रेल्वे स्थानकावर समर्थकांकडून ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले.

नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बालाजी कल्याणकर हे देवगिरी एक्सप्रेसने आज शुक्रवार दि. 8 जूलै रोजी सकाळी नांदेड रेल्वे स्थानकावर दाखल झाले. त्यांच्या समर्थकांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. यावेळी रेल्वे स्टेशन ते आ. कल्याणकर यांचे शिवालय जनसंपर्क कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात आली.

मागील राजकीय घडामोडीमध्ये आ. बालाजी कल्याणकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये सामील झाले. त्यानंतर आज दि. ८ रोजी त्यांचे देवगिरी एक्सप्रेसने नांदेडमध्ये आगमन झाले. बंड आणि राज्यातील सत्तांतरानंतर 20 दिवसांनंतर ते नांदेडला आल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी स्वागताची जय्यत तयारी केली होती. रेल्वेस्थानक ते आ. कल्याणकर यांचे शिवालय जनसंपर्क कार्यालयपर्वत भव्य रॅली काढण्यात आली. मागील सुमारे 20 दिवसांपासून ते मतदारसंघाच्या बाहेर होते.

यावेळी सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष नारायण कदम तसेच तळणीचे सरपंच वैजनाथ सूर्यवंशी, सायाळचे उपसरपंच होणाची जामगे, पिंपरी महीपालचे सरपंच हनुमान चंदेल, वाढवणा खडकीचे सरपंच संजय पोहरे, उपसरपंच नागोराव कदम, निळ्याचे सरपंच रोहित हिंगोले, पोखरणीचे सरपंच सचिन पाटील, धानोयाचे सरपंच बालाजी पोपळे, मुन्ना राठोड, राजू गुडावार, मनोज ठाकूर, शक्तीसिंह ठाकुर, संतोष मादमवाड, सुगावचे उपसरपंच अनिल शिंदे, संतोष भारसवडे, नवनाथ काकडे, विनायक बोकारे, गणेश बोकारे, बालाप्रसाद शिंदे, महेश नवले, गिरधारी जोगदंड, अमृत भारसावडे, राजदीप पावडे, रामेश्वर शिंद, बालाजी पावडे, माधवराव कल्याणकर, दिगंबर कल्याणकर, प्रणव बोडके, श्याम वन, धनंजय पावडे, दीपक भोसले, लोकेश सातीर, गोविंद भुरे, गजानन धुमाळ, विजय कदम, नागेश जनकवाडे, संतोष जाधव, सुदीप देशमुख यांच्यासह बालाजी कल्याणकर यांचे समर्थक उपस्थित होते.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!