ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

◆ वाजेगाव बायपास रस्त्यावरील घटना, दोन मेव्हणे अटकेत
नवीन नांदेड– बहिणीला त्रास देणाऱ्या मेव्हण्याच्या डोक्यात काठी घालून भररस्त्यात खून करण्यात आल्याची घटना वाजेगाव बायपास रस्त्यावर घडली आहे.
बहिणीला त्रास देत असल्याच्या कारणावरुन दोन मेहुण्यांनी भावोजीचा डोक्यात काठी घालून खुन केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी गुरुवारी दोन आरोपींना ताब्यात घेतले असून न्यायालयात हजर केले आहे.
वाजेगाव बायपास जवळ शेख चाँदपाशा खाजामिया (वय ३५ वर्षे) यास त्याच्या दोन सख्या मेहुण्यांनी तु आमच्या बहिणीस त्रास का देतोस? तू काही काम करत नाहीस? विचारणा करीत आधी त्याच्याशी वाद घातला आणि नंतर काठीने डोक्यात जबर मारहाण केली. यात ते गतप्राण झाला.
याप्रकरणी मयताचे भाऊ शेख वली पि. खाजामियाँ रा. कांजाळा, ता. लोहा, जि.नांदेड यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन ग्रामीण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली विजय पाटील, पो. उपनिरीक्षक विजय पाटील यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला.
ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील वाजेगाव येथील टापरे चौकालगत असलेल्या मोकळ्या जागेत ही घटना घडली. शेख चांद पाशा खाजा मियां यांचा मृतदेह याठिकाणी आढळून आल्यानंतर घटनास्थळी अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ सिध्देश्वर भोरे व ग्रामीणचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश होळकर यांनी भेट देऊन पाहणी केली व तात्काळ पंचनामा केला. या प्रकरणी गुन्हा रजिस्टर नंबर १०८/ २२ कलम ३०२ ,३४ भादंविनुसार पोलिसांनी दोन आरोपी शेख इक्बाल शेख रब्बानी,शेख जावेद पिता शेख रब्बानी (दोघे रा. जामा मस्जिद वाजेगाव) यांना अटक केली आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
