Saturday, July 27, 2024

तृप्ती सांडभोर नांदेड महानगरपालिकेच्या नव्या आयुक्त; डॉ. सुनील लहाने यांची परभणी महानगरपालिकेच्या आयुक्तपदी बदली

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड- महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सुनील लहाने यांची परभणी महानगरपालिकेच्या आयुक्तपदी बदली झाली आहे. तर तृप्ती सांडभोर यांची नांदेड महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तृप्ती सांडभोर या पनवेल महानगरपालिका येथे अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत होत्या. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्यानंतर आता महानगरपालिका आयुक्तांचीही बदली झाली आहे.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम 36 नुसार आयुक्त नांदेड- वाघाळा महानगरपालिका या पदावर पनवेल महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांची नेमणूक करण्यात आली आहे. तृप्ती सांडभोर यांनी नांदेड- वाघाळा महानगरपालिकेच्या आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारावा व तसा अनुपालन अहवाल शासनास सादर करावा असे आदेश सचिव ल. आ. लक्कस यांच्या स्वाक्षरीने 30 ऑगस्ट रोजी जारी करण्यात आले आहेत.

त्याचबरोबर नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सुनील लहाने यांची बदली परभणी महानगरपालिकेच्या आयुक्तपदी करण्यात आली आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!