Tuesday, December 3, 2024

महापालिकेकडून आणखी एका रुग्णालयाला दंड; जैविक कचरा मनपाच्या घंटागाडीत टाकला

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड– महापालिकेने शहरातील आणखी एका रुग्णालयाला दंड ठोठावला आहे. विश्वप्रयाग हॉस्पिटलविरुद्ध ही कारवाई करण्यात आली असून या हॉस्पिटल 10 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. बेकायदेशीरपणे जैविक कचरा मनपाच्या घंटागाडीत टाकल्याच्या कारणावरून हा दंड आकारण्यात आला आहे. काही दिवसांपुर्वीच डॉक्टर लेन भागतीलच तुकामाई हॉस्पिटलवरही अशाच प्रकारे दंडाची कारवाई करण्यात आली होती.

सोमवार दि. 31 जानेवारी रोजी मनपाच्या क्षेत्रिय कार्यालय क्र. चार ( वजिराबाद ) हद्दीतील प्रभाग क्र. 17 अंतर्गत डॉ. लेन, वजिराबाद येथील विश्वप्रयाग हॉस्पीटल यांनी बॉयो-मेडीकल वेस्ट मनपाच्या घंटागाडीमध्ये टाकून शहरातील नागरिकांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण केल्याच्या कृत्याबद्दल संबंधित हॉस्पिटलविरुध्द 10 दहा हजार रुपये दंडात्मक कार्यवाही करुन दंड वसूल करण्यात आला. तसेच बॉयो-मेडीकल वेस्ट नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वैद्यकीय व्यवसायधारकाविरुद्ध कारवाई अधिक तीव्र केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

सदरची कारवाई आयुक्त डॉ. सुनिल लहाने, अतिरिक्त आयुक्त बाबासाहेब मनोहरे, उप- आयुक्त शुभम क्यातमवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता विभागाचे सहा. आयुक्त मो. गुलाम सादेक, क्षेत्रिय अधिकारी डॉ. राईसोद्दीन, स्वच्छता निरिक्षक राजेंद्र गंदमवार, वसिम तडवी, मोहन लांडगे व ईतर कर्मचारी यांनी केली.

शहरातील सर्व हॉस्पिटल, क्लिनिक, दवाखाने इत्यादी व्यवसायिकांना महानगरपालिकेच्या आवाहन करण्यात आले आहे की, दैनंदिन निर्माण होणारा जैविक कचरा (Bio-medical waste) मनपाच्या घंटागाडीत किंवा सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर अनाधिकृतरित्या न टाकता मनपाने नियुक्त केलेल्या संस्थेकडे सुपूर्द करावे. पण काही रुग्णालयांकडून याची पायमल्ली केली जात आहे. याच कारणावरून घनकचरा व्यवस्थापन नियम-2016 व बॉयोमेडीकल वेस्ट हेन्डलींग रुल्स् 1998 मधील तरतुदीनुसार संबंधित वैद्यकीय व्यवसाय धारकांविरुध्द दंडात्मक कार्यवाही करण्यात येत आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!