Saturday, July 27, 2024

मित्राला वाचवण्यास धावला, पण… 2 तरुणांचा तलावात बुडून मृत्यू

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

◆ हदगाव तालुक्यात दोन युवकांचा शेततळ्यात बुडून मृत्यू

हदगाव–  तालुक्यातील बनचिंचोली येथे शेततळ्यामध्ये पडून दोन युवकांचा मृत्यू झाल्याची घटना आज मंगळवार दिनांक ११ रोजी हदगाव तालुक्यातील बन चिंचोली येथे घडली आहे. संजीव गणेश कवाने वय 18 वर्ष आणि दत्ता भगवान जटाळे वय 20 वर्षे अशी या तरुणांची नावे आहेत.

संजीव गणेश कवाने यांनी चिंचोली येथील गोविंदराव पोळ यांचे शेत करण्यासाठी घेतले आहे. याच शेततळ्यामध्ये संजीव गणेश कवाने व यांचा मित्र दत्ता जटाळे हा मासोळ्या पकडण्यासाठी गेले असल्याचे तेथील प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. मासोळ्या पकडत असतांनाच दत्ता शेततळ्यांमध्ये पडल्याचे लक्षात येताच त्याला वाचवण्यासाठी संजीव कवानेही पाण्यात उडी घेतली.

पण, यात ते दोघेही बुडाल्याची घटना घडली आहे. घटनास्थळी पोलीस हवलदार नांदेड व पोलीस बीट जमादार विश्वनाथ हंबर्डे हे घटनास्थळी दाखल झाले असून दोघांचेही मृतदेह पाण्याबाहेर काढून त्यांना शवविच्छेदनासाठी हदगाव उपजिल्हा रुग्णालय येथे आणण्यात आले आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!