Thursday, March 28, 2024

रस्त्यावरील मातीच्या ढिगाऱ्याला धडकून दोन दुचाकीस्वार ठार; अंत्यविधी आटोपून निघाले असताना वारंगा- हदगाव रस्त्यावर अपघात

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड– नातेवाईकाचा अंत्यविधी आटोपून गावाकडे परतणाऱ्या दोन युवकांवर वारंगा फाटा ते हदगाव दरम्यान सिबदरा पाटीजवळ काळाने घाला घातला. रस्त्यावरील मातीच्या ढिगाऱ्याला दुचाकी धडकून दोन्ही दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवारी दिनांक 25 मार्च रोजी रात्रीच्या सुमारास घडली.

वारंगा येथून हदगावकडे जात असताना शिबदरा पाटीजवळ (ता. हदगाव, जि. नांदेड) एका मातीच्या ढिगा-याला दुचाकी धडकून झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. चिखली (ता. कळमनुरी) येथील नातेवाईकांमधील एकाची अंत्यविधी आटोपून शुक्रवारी (ता. २५) रात्री सात वाजता वारंगा येथुन हदगावकडे दुचाकीवरून (एमएच२६- बीयु ७९७०) सटवाराव सुर्यवंशी (वय ४८) व माधवराव बोंढारे (वय ५०) दोघेही राहणार हरफड (ता. हदगाव) येथे येत होते.

त्यावेळी शिबदरा पाटीजवळ रस्त्यावर असलेल्या ढिगाऱ्याजवळ दिशा फलक नसल्याने दुचाकी ढिगाऱ्यावर उलटून पडल्याने दोघांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच मनाठा पोलिस ठाण्याचे बीट हवालदार गिरी, कर्मचारी वाघमारे व त्यांचे सहकारी दाखल झाले. सहायक पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण व चिट्टेवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असल्याची माहिती बीट हवालदार गिरी यांनी दिली. याप्रकरणी मनाठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]

Latest Articles

error: Content is protected !!