Sunday, June 4, 2023

रेल्वे विभागात नोकरीचे आमिष दाखवून तब्बल ४१ लाख रुपयांना गंडा; माळाकोळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड– रेल्वे विभागात सरकारी नोकरी लावतो म्हणून लोहा तालुक्यातील सहा जणांना तब्बल ४१ लाख ६ हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. याप्रकरणी उत्तर प्रदेशातील एका भामट्याविरुद्ध माळाकोळी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माळाकोळी परिसरातील एका बेरोजगारासह सहा जणांना रेल्वेत नोकरी लावतो म्हणून ४१ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार डिसेंबर २०१९ पासून सुरू होता. धनंजय बालाजी गायकवाड (वय २२) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सन २०१९ पासून उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील ओमप्रकाश पांडे उर्फ सत्येंद्र राजेश्वर मिश्रा याने गावातील हनमंत बालाजी गायकवाड, प्रल्हाद मोहन गायकवाड, सचिन मारोती गायकवाड, नामदेव आबाराव गायकवाड, परमेश्वर वानखेडे आणि ते स्वत: अशा सहा जणांना रेल्वे खात्यात नोकरी लावतो म्हणून प्रत्येकाकडून ६ लाख ६० हजार रुपये असे एकूण ४१ लाख ६० हजार रुपये बॅंक खात्याद्वारे व कांही रोख स्वरुपात घेतले.

हे लाखों रुपये उकळून या भामट्याने या बेरोजगार तरुणांना बनावट नेमणुक पत्र आणि ओळखपत्र देवून त्यांची फसवणूक केली. याप्रकरणी माळाकोळी पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास माळाकोळीचे सहाय्यक पोलीस निरिक्षक डोके करत आहेत.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

1 COMMENT

  1. Thank you for sharing superb informations. Your site is so cool. I’m impressed by the details that you’ve on this website. It reveals how nicely you perceive this subject. Bookmarked this website page, will come back for extra articles. You, my friend, ROCK! I found just the info I already searched everywhere and simply couldn’t come across. What a great web-site.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,797FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles

error: Content is protected !!