ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
लोहा- शहरातील शिवकल्याण नगरात राहणाऱ्या 46 वर्षीय राजस्थानी व्यापाऱ्याने राहत्या घरात वायरच्या साह्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना दुपारी चार वाजेच्या सुमारास उघडकीस आली.
राजस्थान राज्यातील बाडमेर जिल्ह्यातील रहिवाशी असलेल्या पद्मराम चौधरी (वय 46) यांचे शहरातील बसस्थानकासमोर माॅ भवानी बिकानेर स्विटस नावाने मागील दाहा आकरा महीन्यांपासून दुकान सुरू आहे. दैनंदिन दुकान मालक चौधरी यांनी एका नोकरासह दुकान उघडून रोजच्या प्रमाणे दुकान व्यवसायास सुरुवात केली. दुपारी बारा वाजे सुमारास दुकान मालक चौधरी हे नोकरास पोट बिघडले म्हणून शिवकल्याण नगर स्थित घराकडे गेले. बराच वेळ झाला तरी ते परत आले नाहीत. साडेतीन वाजे सुमारास चौधरी यांच्या गावाकडुन नोकरास फोन आला व पद्मराम यांचा फोन लागत नाही माहिती घे. असे सांगण्यात आले असता नोकराने शिवकल्याण नगरातील घरी जाऊन पद्मराम यांना आवाज दिला मात्र दरवाजा आतून लावल्याने उघडला नाही. कांही वेळाने दरवाजा उघडून आत पाहिले असता पद्मरामने घरावरील पत्र्याच्या इंगलला वायरच्या साह्याने गळफास लावून आत्महत्या केल्याचे आढळून आले. घटनास्थळास लोहा पोलीस ठाण्याचे पोहेकॉ अशोक केंद्रे, गीरे, आदींनी भेट देवून पंचनामा केला. याप्रकरणी लोहा पोलिसात उशीरापर्यंत घटनेची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.
ReplyReply allForward |
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻