Saturday, July 27, 2024

विद्यार्थिनींनो सावधान! क्लासेसला निघालेल्या विद्यार्थिनीच्या गळ्यातील सोन्याची चेन चोरट्यांनी हिसकावली, भरदुपारची घटना

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड– भाग्यनगर परिसरात असलेल्या खासगी शिकवणीला जाणाऱ्या एका विद्यार्थिनीच्या गळ्यातील सोन्याची चेन दुचाकीवर आलेल्या चोरट्याने हिसकावल्याची घटना भररस्त्यावर घडली आहे. भाग्यनगर परिसरातील दामोडकर ऑप्टिकलसमोर  भरदुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली. 

शहराच्या वेदांतनगर भागात राहणारी एक विद्यार्थिनी काल आठ डिसेंबर रोजी दुपारी दोनच्या सुमारास भाग्यनगर परिसरातील आयआयबी नीटच्या क्लासला जाण्यासाठी एका ऑटोमधून उतरली. उतरून पायी जात असताना तिच्या पाठीमागून बिना नंबरच्या काळ्या रंगाच्या स्कुटीवरून आलेल्या चोरट्यांनी तिच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावून पोबारा केला. सुमारे तीस हजार रुपये किमतीची सात ग्रॅम वजनाची ही चेन होती.

या प्रकरणी साक्षी मुंजाजी वैद्य या विद्यार्थिनीच्या फिर्यादीवरून भाग्यनगर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वाठोरे करत आहेत.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!