Saturday, July 27, 2024

शिवसेनेची राष्ट्रवादीला साथ! माहूरच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे फिरोज दोसानी; काँग्रेसला बाजुला ठेवले

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड/ माहूर– माहूर नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे फिरोज दोसानी विजयी झाले आहेत. शिवसेनेच्या मदतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे फिरोज दोसानी यांनी विजय मिळविला.

नुकत्याच झालेल्या माहूर नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक उमेदवार निवडून आणले होते. नायगाव आणि अर्धापूर नगरपंचायतचे नगराध्यक्षांची निवड झाल्यानंतर माहूर नगरपंचायत निवडीवर एकमत होत नव्हते. अखेर शिवसेनेच्या बळावर राष्ट्रवादी काँग्रेसचे फिरोज दोसानी हे 10 मते घेऊन विजयी झाले आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेनेला सोबत घेऊन सत्ता मिळविण्याचा काँग्रेसचा प्रयत्न होता, पण राष्ट्रवादी आणि शिवसेनेची युती काँग्रेसला फोडता आली नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसचे फिरोज दोसानी यांना नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत दहा मते मिळाली तर काँग्रेसला सहा मते मिळाली. भाजपचा एक उमेदवार तटस्थ राहिला. शिवसेनेचे सर्व मते राष्ट्रवादीच्या पारड्यात पडली. उपविभागीय अधिकारी किर्तीकुमार पुजार यांच्या प्रमुख उपस्थितीत पीठासीन अधिकारी माहूरचे तहसीलदार किशोर यादव यांनी फिरोज दोसानी यांना नगराध्यक्षपदी विजयी झाल्याचे घोषित केले.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!