Sunday, April 14, 2024

श्रद्धांजलीचे व्हाट्सअप स्टेटस ठेऊन हदगाव तालुक्यात प्रेमी युगूलाची आत्महत्या

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

श्रद्धांजलीचे व्हाट्सअपवर स्टेटस ठेवल्याने घटना उघड

नांदेड/ हदगाव– लग्नास दोघांच्या घरचा विरोध होत असल्याने हदगाव तालुक्यातील वडगाव येथील एका प्रेमीयुगुलाने विष प्राशन करून आत्महत्या केली. या घटनेमुळे हदगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे. ही घटना सोमवार दि. ३ जानेवारी रोजी सकाळी उघडकीस आली.

सदर घटना तामसा जवळील वडगाव शिवारात सोमवारी पहाटे उघडकीस आली. आपल्या मोबाईलवर स्वत:च्याच श्रद्धांजलीचे स्टेट्स ठेवल्यामुळे या घटनेचा सुगावा लागला. तामसा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मयत तरूण शेषेकांत रामराव पाटील (वय २४) आणि तरुणी ही शिवानी केशव हरण (वय २२) असे प्रेमी युगलाची नावे आहेत. वडगाव शिवारात या दोघांनी विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. प्राथमिक माहितीनुसार प्रेमी युगल हे एकाच गावातील असून एकाच समाजातील होते. विवाहाला  घरचे मान्यता देणार नाहीत या विवंचनेतून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असल्याची बोलले जात आहे.

दरम्यान, सोमवारी सकाळी त्यांच्या मित्रांनी दोघांच्या मोबाईलवर ठेवलेले स्टेट्स बघून त्यांना फोन केले. परंतु फोनचे उत्तर मिळत नव्हते म्हणून त्यांनी त्यांच्या वडिलांना कळवले. यानंतर सदरील घटना उघडकीस आली असून तालुक्यात या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. दोघांच्या पार्थिववदेहावर आज दुपारी तीन वाजता तामसा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. तामसा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करणयाची प्रक्रिया सुरू होती. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक अशोक उजगरे करत आहेत.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]

Latest Articles

error: Content is protected !!