Monday, October 14, 2024

संपत्तीचा वाद: भावाचा खून करून रक्ताने माखलेल्या चाकूसहित आरोपी पोलीस ठाण्यात

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

◆ भावाने केला सख्ख्या चुलत भावाचा खून

नांदेड– शहरातील गाडीपुरा भागात एका प्लॉटच्या वादातून चुलत भावाने आपल्या चुलत भावास चाकूने भोसकून खून केला. ही घटना शुक्रवार दिनांक 17 जून रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास गाडीपुरा भागातील एक खांबा दर्गासमोर घडली.

नांदेड शहरातील गाडीपुरा येथे राहणारा मनोजसिंह राजेंद्रसिंह परमार ( वय 35) आणि त्याचा चुलत भाऊ श्यामसिंह प्रकाशसिंह परमार (वय 45)  यांचे मागील काही दिवसांपासून सामायिक संपत्तीतून वाद होत होता. त्यांचे अनेक वेळा किरकोळ भांडणेही झाले होते. याच वादातून आज शुक्रवारी मनोज परमार याने श्यामसिंह परमार याला चाकूने भोसकून त्याचा खून केला.

खून केल्यानंतर मनोजसिंह परमार हा रक्ताने माखलेला चाकु घेऊन इतवारा पोलीस ठाण्यात हजर झाला. माझ्या चुलत भावाचा खून करून आलोय, असे म्हणताच पोलीस आश्चर्यचकित झाले. पोलीस निरीक्षक भगवान धबडगे यांनी त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सिद्धेश्वर भोरे, पोलीस निरीक्षक भगवान धबडगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक आर. एस. मुत्तेपोड, फौजदार असद शेख यांनी घटनास्थळ गाठले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या श्यामसिंह परमार याला शासकीय रुग्णालय विष्णुपुरी येथे दाखल केले. परंतु उपचार सुरू होण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!