Tuesday, November 5, 2024

हेमंत पाटील यांना विधानपरिषदेची आमदारकी! विधान भवनात सात जणांनी घेतली आमदारपदाची शपथ!

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

मुंबई / नांदेड – गेल्या पाच वर्षांपासून रखडलेल्या राज्यपाल नियुक्त विधानपरिषद आमदारकीला अखेर आज मुहुर्त मिळाला आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून राज्यपाल नियुक्त विधानपरिषद आमदारकीसाठी 12 आमदारांची नियुक्ती रखडली होती. अखेर आज राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी 12 पैकी 7 नेत्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात नांदेडचे माजी आमदार तथा माजी खासदार हेमंत पाटील यांना संधी मिळाली आहे.

आज महाराष्ट्रातील राज्यपाल नियुक्त आमदारांचा शपथविधी सोहळा पार पडला. दुपारी 12 वाजता विधानभवनातील सेंट्रल हॉलमध्ये हा सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे या विधानपरिषद सदस्यांना शपथ दिली. महाराष्ट्राच्या राज्यपाल नियुक्त आमदारांच्या शपथविधीसाठी विधीमंडळात जोरदार तयारी करण्यात आली होती. उपसभापती निलम गोरे यांच्या उपस्थितीत हा शपथविधी पार पडला. राज्यतील विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी महायुती मोठी खेळी करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारकडून राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी तयार करण्यात आली होती. या आमदारांच्या नावांची यादी सोमवारी राज्यपालाकंडे पाठवण्यात आली होती. त्यानंतर रात्री उशिरा राज्यपालांनी या नावांना मंजुरी दिली आहे.

राज्यपाल नियुक्त सात आमदारांमध्ये भाजपकडून चित्रा वाघ, विक्रम पाटील, धर्मगुरु महाराज राठोड या तिघांना संधी देण्यात आली आहे. तर शिवसेनेकडून माजी खासदार हेमंत पाटील आणि मनीषा कायंदे आणि राष्ट्रवादीकडून इंद्रीस नायकवाडी, पंकज भुजबळ यांना राज्यपाल कोट्यातून आमदारकीची संधी देण्यात आली आहे. नुकताच या सात जणांनी आमदारकीची शपथ घेतली.
हेमंत पाटील यांना हिंगोलीतून लोकसभेची उमेदवारी नाकारण्यात आली होती. त्यानंतर आता त्यांचे एकप्रकारे राजकीय पुनर्वसन करण्यात आले आहे.

राज्यपाल नियुक्त आमदारांची नावे

चित्रा वाघ (भाजप)
विक्रांत पाटील (भाजप)
बाबुसिंग महाराज राठोड (भाजप)
मनीषा कायंदे (शिवसेना – शिंदे गट)
हेमंत पाटील (शिवसेना – शिंदे गट)
पंकज भुजबळ (राष्ट्रवादी – अजित पवार गट)
इद्रिस नायकवडी (राष्ट्रवादी – अजित पवार गट)

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!