Sunday, May 19, 2024

नांदेडमध्ये प्राणघातक हल्ल्यातील गंभीर जखमी शिवसैनिकाचा उपचारादरम्यान मृत्यू; ७ दिवस मृत्यूशी झुंज

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड– शहरातील सोमेश कॉलनी येथे राहणारे श्रीकांत पाठक यांचा उपचारादरम्यान आज शुक्रवार दि. ३० जून रोजी सकाळी सहा वाजता मृत्यू झाला. त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. या प्राणघातक हल्ल्यानंतर, गेली सात दिवस मृत्यूशी सुरू असलेली त्यांची झुंज अपयशी ठरली आहे. या हल्ल्याप्रकरणी काँग्रेसचे सुनील शर्मासह सहा जण सध्या पोलीस कोठडीत आहेत.

शहराच्या सोमेश कॉलनी भागातील स्वामी समर्थ मंदिराच्या एका कार्यक्रमाच्या होर्डिंगवरून शिवसैनिक श्रीकांत पाठक यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. ही घटना दि. २३ जून रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली होती. या हल्ल्यात गंभीर जखमी श्रीकांत पाठक यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.

सोमेश कॉलनी भागातील श्रीकांत पाठक हे याच भागात असलेल्या श्री स्वामी समर्थ मंदिराचे विश्वस्त सदस्य म्हणून मागील अनेक वर्षांपासून काम पाहत होते. या मंदिरावर अक्कलकोट येथील स्वामींच्या पादुका येणार असल्याने बॅनर लावण्यात आले होते. या बॅनरवर शहरातील प्रतिष्ठित व राजकीय लोकांची नावे टाकण्यात आली होती. यावरून श्रीकांत पाठक यांनी स्वामी समर्थ विश्वस्त व्हाट्सअप ग्रुपवर विचारणा केली होती. याचाच राग आल्याने आरोपी स्थानिक काँग्रेस नेते सुनील शर्मा व त्याच्या इतर चार ते पाच अनोळखी साथीदारांनी श्रीकांत पाठक यांना जबर मारहाण केली होती. यात फायबर लाठी व विटांचा वापर करून गंभीर दुखापत करण्यात आली होती.

या हल्ल्यात श्रीकांत पाठक हे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर जुना कौठा येथील यशोसाई हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. याप्रकरणी त्यांची पत्नी सोनाली श्रीकांत पाठक यांच्या फिर्यादीवरून वजिराबाद पोलीस ठाण्यात सुनील शर्मा व त्याच्या इतर चार ते पाच साथीदारांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, उपचारादरम्यान आज सकाळी शिवसैनिक श्रीकांत पाठक यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

या हल्ल्याप्रकरणी याआधीच दाखल गुन्ह्याप्रमाणे वजिराबाद पोलिसांनी सुनील किशोरीलाल शर्मा (वय ६३), श्लोक राजेश शर्मा (वय २८) आणि शेख रहेमान शेख  रमजान (वय २३) व इतर तीन अशा सहा जणांना अटक केलेली आहे. बुधवार दि. २८ जून रोजी या सर्वांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायाधीश देसरडा यांनी आरोपींना एक जुलैपर्यंत पोलीस कोठडीत पाठवले आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू मुत्तेपोड करत आहेत.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]

Latest Articles

error: Content is protected !!