Friday, April 19, 2024

भोसकून खून प्रकरणाला वेगळे वळण? 4 जणांना अटक; सोबत असणाऱ्यानेच घात केल्याचा वडिलांना संशय

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड– तालुक्यातील चिखली येथील काका- पुतण्या दोघेजण आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी आले असताना त्यांच्या दुचाकीचा धक्का लागल्याने अनोळखी मारेकर्‍यांनी त्यांच्यावर खंजरने हल्ला करून भोसकून खून केला. यात अनिल शेजुळे याचा मृत्यू झाला तर काका राजकुमार शेजुळे हा जखमी झाला होता. या प्रकरणी सहा जणांविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी चार मारेकऱ्यांना ताब्यात घेतले आहे. मात्र मयताच्या वडिलांनी मयत अनिलच्या सोबत असणारा काका राजकुमार शेजुळे यांच्या विरोधातच तक्रार अर्ज दिल्याने या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शनिवारी दिनांक 19 फेब्रुवारी रोजी सर्वत्र पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोलीस निरीक्षक अनंत नरुटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी वाहुळे आणि इतर अधिकारी, कर्मचारी आपल्या कर्तव्यावर हजर होते. चिखली तालुका नांदेड येथील अनिल शेजुळे आणि राजकुमार शेजुळे हे दोघेजण आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी नांदेडला दुचाकीवरून आले होते. त्यांची दुचाकी मगनपुरा भागातील एका होन्डा शोरूमसमोर  आल्यानंतर दुसर्या दुचाकीस्वाराला त्यांचा धक्का लागला. यातूनच त्यांचा वाद झाला आणि अनोळखी मारेकर्‍यांनी या दोघांवर चाकूने हल्ला चढविला. यात अनिल शेजुळे हा गंभीर जखमी झाला तर राजकुमार शेजुळे हा किरकोळ जखमी झाला. घटनेची तात्काळ माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक रवि वाहुळे हे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिस वाहनातून या दोघांनाही नांदेडच्या विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार करण्यापूर्वीच अति रक्तस्राव झाल्याने अनिल शेजुळे याचा मृत्यू झाला. याप्रकरणी जखमी राजकुमार शेजुळेंच्या फिर्यादीवरून सहा जणांविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न यासह आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी वाहुळे यांनी चार जणांना ताब्यात घेतले आहे. या चारही जणांची उद्या न्यायालयासमोर हजर करणार असल्याचे वाहुळे यांनी सांगितले.

घटना घडल्याची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलिस अधिकारी (शहर) चंद्रसेन देशमुख, स्थानिक गुन्हे शाखेचे द्वारकादास चिखलीकर यांनी घटनास्थळाला भेट दिली.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]

Latest Articles

error: Content is protected !!